उमेद सहकारी पतसंस्था मर्यादित, मनोगत – ऍड. राजेंद्र पालवे (चेअरमन).
"उम्मीद है तो मुमकिन है" या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही जानेवारी २०२४ पासून उमेद सहकारी पतसंस्थेचा कार्यभार हातात घेतला. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली असून, “क” श्रेणीतील ऑडिट वर्गातून “ब” श्रेणीत संस्थेची घसरण यशस्वीरित्या थांबवण्यात आली. संस्थेची आर्थिक उलाढाल केवळ ₹२५,००० पासून वाढून ₹२.५० कोटींवर नेली गेली, ही आमच्या सामूहिक प्रयत्नांची जिवंत साक्ष आहे.
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संस्थेला डिजीटल रूपात सशक्त बनवण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संस्थेची ही नवी वेबसाईट तयार केली असून, ही तरुणाईसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या वेबसाईटद्वारे सभासदांना आर्थिक साक्षरतेबाबत माहिती मिळेल, तसेच स्वतःचे आर्थिक व्यवहार नोंदवण्याची आणि नियोजन करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.माझा स्वतःचा ३५ वर्षांचा सहकार क्षेत्रातील अनुभव आणि आमचे सीईओ हे इंजिनिअरिंग पदवीधर असून एम.एससी. फायनान्सचे शिक्षण घेतलेले आहेत. संस्थेच्या संचालक मंडळात ८०% तरुण आणि उच्चशिक्षित सदस्य आहेत, सर्व कर्मचारी वर्गही तरुण व टेक्नोसेवी आहे. ही तरुणाई संस्थेच्या विकासाची खरी ताकद आहे.
आमचे ध्येय स्पष्ट आहे – समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे. महिलांना, वृद्धांना आणि तरुणांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठीच आम्ही “आर्थिक साक्षरता” ही मोहीम सुरू केली आहे. SIP, SWP पासून कौटुंबिक बजेट तयार करण्याचे प्रशिक्षण, वित्तीय नियोजनाचे मूलभूत ज्ञान – हे सर्व आम्ही तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून सभासदांपर्यंत पोहोचवत आहोत.
संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी एक सल्लागार मंडळ तयार केले आहे – ज्यामध्ये आयटी, बँकिंग, मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि व्यवसाय विकास क्षेत्रांतील जाणकारांचा समावेश आहे.
"एकत्रित विचार आणि परिपक्व आचार" या तत्त्वाचा अंगीकार करत आम्ही संपूर्ण समाजाला एका ध्येयासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्येष्ठांप्रमाणेच आजच्या तरुण वर्गाचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मी या माध्यमातून सर्व तरुणांना आवाहन करतो – आपण सर्वजण एका मंचावर एकत्र येऊ, सहकाराला नव्या उंचीवर नेऊ आणि एक सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणू.
"स्नेह व विश्वास आमचा ठेवा, विकास आणि प्रगतीची आमची अपेक्षा."
आपला स्नेहांकित,
ऍड. राजेंद्र पालवे
चेअरमन,
उमेद सहकारी पतसंस्था मर्यादित
उमेद सहकारी पतसंस्था मर्यादित, मनोगत – ऋषिकेश राजेंद्र पालवे (मुख्य कार्यकारी अधिकारी)..
“उम्मीद है तो मुमकिन है” या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही जानेवारी २०२४ पासून उमेद सहकारी पतसंस्थेचा कार्यभार हातात घेतला. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली असून, “क” श्रेणीतील ऑडिट वर्गातून “ब” श्रेणीत संस्थेची घसरण यशस्वीरित्या थांबवण्यात आली. संस्थेची आर्थिक उलाढाल केवळ ₹२५,००० पासून वाढून ₹२.५० कोटींवर नेली गेली, ही आमच्या सामूहिक प्रयत्नांची जिवंत साक्ष आहे.
आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संस्थेला डिजीटल रूपात सशक्त बनवण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संस्थेची ही नवी वेबसाईट तयार केली असून, ही तरुणाईसोबतची ही भागीदारी आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या वेबसाईटद्वारे सभासदांना आर्थिक साक्षरतेबाबत माहिती मिळेल, तसेच स्वतःचे आर्थिक व्यवहार नोंदवण्याची आणि नियोजन करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
माझा स्वतःचा ३५ वर्षांचा सहकार क्षेत्रातील अनुभव आणि आमचे सीईओ हे इंजिनिअरिंग पदवीधर असून एम.एससी. फायनान्सचे शिक्षण घेतलेले आहेत. संस्थेच्या संचालक मंडळात ८०% तरुण आणि उच्चशिक्षित सदस्य आहेत, सर्व कर्मचारी वर्गही तरुण व टेक्नोसेवी आहे. ही तरुणाई संस्थेच्या विकासाची खरी ताकद आहे.
आमचे ध्येय स्पष्ट आहे – समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणे. महिलांना, वृद्धांना आणि तरुणांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठीच आम्ही “आर्थिक साक्षरता” ही मोहीम सुरू केली आहे. SIP, SWP पासून कौटुंबिक बजेट तयार करण्याचे प्रशिक्षण, वित्तीय नियोजनाचे मूलभूत ज्ञान – हे सर्व आम्ही तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून सभासदांपर्यंत पोहोचवत आहोत.
“एकत्रित विचार आणि परिपक्व आचार” या तत्त्वाचा अंगीकार करत आम्ही संपूर्ण समाजाला एका ध्येयासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्येष्ठांप्रमाणेच आजच्या तरुण वर्गाचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मी या माध्यमातून सर्व तरुणांना आवाहन करतो – आपण सर्वजण एका मंचावर एकत्र येऊ, सहकाराला नव्या उंचीवर नेऊ आणि एक सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणू.
“स्नेह व विश्वास आमचा ठेवा, विकास आणि प्रगतीची आमची अपेक्षा.”
आपला स्नेहांकित,
ऋषिकेश राजेंद्र पालवे
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO),
उमेद सहकारी पतसंस्था मर्यादित
!!! To become a member.